भुसावळ , प्रतिनिधी – भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं . नाहाटा वाणिज्य महाविधालयातील मराठी विभागातर्फे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ. के.के. अहिरे, प्रा. डॉ . जे. एफ. पाटील इतिहास विभागाचे डॉ. दिपक शिरसाठ यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या बद्दल स्वच्छते बाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा भारती सोनवणे यांनी केले . यावेळी प्रा डॉ. दिनानाथ पाठक, प्रा. पुरुषोत्तम महाजन, डॉ. स्वाती महाजन, प्रा. भारती सोनवणे, प्रा. वंदना नेमाडे प्रा गौतम भालेराव आदी उपस्थित होते प्रा. गौतम भालेराव यांनी केले



