राज्यस्तरीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ रवाना :

भुसावळ – महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची २१ वी ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा रत्नागिरी (चिपळूण) येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत साठी जळगाव जिल्हा व शहर संघ रवाना झाले आहे.
जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे निवड चाचणी घेण्यात आली होती, या निवड चाचणीतून व दोन दिवसीय शिबिरानंतर जिल्हा व शहर संघ निवडण्यात आले आहे.जळगाव जिल्हा ओम पाटील ( कर्णधार),चेतन लोधे, प्रेम भोगल, ज्ञानदीप सांगुरे, सोमनाथ चव्हाण, अबुजर पटेल, कृष्णा चव्हाण , राहील बच्छाव, गौरव पाटील, राज कदम, वैभव दहाड, सागर सरदार, मिथुल नागारिया, सचिन राठोडप्रतिक कुलकर्णी (प्रशिक्षक)
तारीख अहमद ( व्यवस्थापक)जळगाव शहर संघतुषार पाटील,प्रतिश इंगळे, सुयोग अधलकर, मोहित पाटील, मिर्झान तडवी (कर्णधार), सचिन पवार, दक्षक चव्हाण, नकुल गळे, सलमान तडवी, भैय्या जोशी, सोहेल तडवी, धीरज इंगळे.विकास पाटील (प्रशिक्षक) , वसीम शेख (व्यवस्थापक) पटना येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार खेळाडूंची निवड , रत्नागिरी (चिपळूण) येथील राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पटना बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेअंती श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड पटना येथे होणार आहे.

दरम्यान निवड झालेल्या संघाला जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मा. आमदार चंद्रकांत सोनवणे, शकील पटेल,डॉ.प्रदीप तळवलकर, प्रा.आनंद उपाध्याय, जिल्हा सचिव वासेफ पटेल, प्रा. आसिफ खान प्रा. संजय चौधरी, प्रदीप साखरे, रमण भोळे ,प्रा. संजय भावसार, संजय राजपूत, योगेश साळुंखे, प्रतीक खराले, युवराज माळी , खुशाल देशमुख आदींनी शुभेच्छा दिल्या.