भुसावळ – देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे 10 कर्मचारी व अधिकारी दोन दिवसांचा संप पुकारला आहेत.सरकार येत्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत बँकीय अधिनियम 2021 ला मांडण्यात येत आहेत. त्यासाठी 16 डिसेंबर व 17 डिसेंबर 2021ला संप पुकारलेला आहे हा संप ग्राहकांच्या सार्वजनिक हितासाठी पुकारलेला आहे.

बँकांचे खाजगीकरण झाल्यास खालील परिणाम होतील :
1) खाते उघडायला रु.5000/- 10000/- लागतील.
2) लहान खातेधारकांना कर्ज मिळणे मुश्किल होईल.
3) इतर चार्जेस च्या नावावर ग्राहकांचे शोषण होईल.
4) शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज मिळणे बंद होईल व सक्तीची कर्ज वसुली केली जाईल.
5) सरकारी योजना राबविणे मुश्किल होईल.
6) शैक्षणिक कर्ज मिळणे मुश्किल होईल.
7 ) शासकीय अनुदाणासाठी खाते उघडणे बंद होईल.
8) बँकांचे बुडीत कर्जाचे प्रमाण वाढेल.
9 ) बँकेत सर्व सामान्य जनतेचे प्रवेश बंद होतील.
10) शाळकरी मुलांचे खाते उघडणे बंद होतील.
11 )व्याजाचे दर खाजगी बँका ठरवतील.
12) नोकर भरती बंद होऊन कॉन्ट्रॅक्ट वर भरती केली जाईल.
13 ) ग्राहकांना कोणत्याही कामासाठी जास्तीत जास्त छुपे शुल्क द्यावे लागतील.
14) स्वातंत्र्या पूर्वी सावकार ज्या प्रमाणे लोकांचे शोषण करत त्या प्रमाणे खाजगी कारण झाल्यास, खाजगी बँका
शोषण करतील, म्हणून सार्वजनिक बँकांचे संपत्तीचे लिलाव थांबवा.वरील सर्व कारणांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन ने 2 दिवसाचा संप पुकारलेला यामध्ये विभागीय सहायक सचिव कैलास तायडे,स्वप्नील कोंथे,नितीन छेडा, रविंद्र सरोदे,अतुल लांडगे,राजेंद्र गुणाले, युवराज पवार,वामन सुरवाडे,संगीता कुलकर्णी,अदिती पांडे,अक्षता देशमुख, अनुपमा जगताप,संगीता खेडे,सलीम तडवी,शहाजी जोसेफ, आनंद रामटेके,संजय भंगाळे आदी उपस्थित होते.


