साईलीला महिला बचत गटातर्फे रानातला महादेव मंदिर येथे ई-श्रमकार्ड व आरोग्य कार्ड नोंदणी अभियान :


भुुसावळ- येथील साईलीला महिला बचत गट नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवीत असतो त्याअंतर्गतच हुडको कॉलनीतील रानातला महादेव मंदिर येथे ई-श्रमकार्ड व आरोग्य कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात आले.
असंघटित कामगारांसाठी देण्यात येणारे ई-श्रमकार्डचा लाभ कॉलनी व परिसरातील लाभार्थ्यांना व्हावा त्यांना कार्ड साठी भटकंती करावी लागू नये या उद्देशाने हे दोघं कार्ड एकाच ठिकाणी मिळावे म्हणून हा कॅम्प लावण्यात आला होता. हा कॅम्प अजून पुढे ही याच ठिकाणी घेण्यात येईल व ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे मत बचत गटाच्या अध्यक्षा ॲड जास्वंदी भंडारी यांनी व्यक्त केले ई-श्रमकार्ड व आरोग्य कार्ड तयार करण्यासाठी देशमुख कॉम्प्युटर्सचे संचालक श्री अनिस देशमुख व ताबीश देशमुख यांनी सहकार्य केले तसेच मंदिर परिसरात हे नोंदणी अभियान राबविण्यासाठी श्री अतुल गुरव , उत्कर्ष भंडारी, स्वाती श्रीगोदेंकर, यांनी मदत केली.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी बचत गट सदस्य सौ सुनिता अनिल राणे सौ नेहा यावलकर सौ मनीषा भंडारे, सौ प्राजक्ता गंधे ,हर्षदा चौधरी व इतर सदस्यांनी सहकार्य केले श्री दिनेश गवळी, श्री भरत बागुल ,श्री मिलिंद गोरवाडकर,श्री नितीन सरोदे, श्री सतीश खरे, सौ. मनिषा पाटील, सौ वैशाली हीरे,श्री. चंद्रकांत देशमुख व रहिवासी उपस्थित होते