डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या कन्येच्या प्रथम वाढदिवसानिमित्त दिला वृक्षसवर्धनाचा संदेश ; १०१फळाचें वृक्ष व १०१ ट्री गार्ड दिले भेट :

भुसावळ (हर्षल पाटील ):-येथील भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी आपली कन्या अवनी प्रथम वाढदिवस स्टार लॉन येथे साजरा केला . यानिमित्त अवनीला आशिर्वाद व शुभेच्छा देण्यास आलेल्या सर्व मान्यवरांना श्री वाघचौरे यांनी १०१ फळाचें रोप व १०१ ट्री गार्ड देऊन वृक्षसंवर्धन करून पर्यावरण जपा असा मोलाचा संदेश देत वृक्ष संवर्धन आणि संगोपन करावे असे आवाहन केले . या स्तुत्य उपक्रमांचे उपस्थितांनी खुप कौतुक केले .
यावेळी स्वर साधना संगीत विद्यालयाच्या सौ स्मिता कुलकर्णी व त्यांच्या समुहाने सुमधुर अशी भावगीते व भक्तिगीते सादर केली त्याच बरोबर संदीप बडगे व मोहम्मद अली सय्यद यांनीही याप्रसंगी सुंदर गीते सादर केली . अवनीच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष व ट्री गार्ड वितरणाबाबत शैक्षणिक आगाजचे राज्य समन्वयक व निसर्ग पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी या उपक्रमा विषयी माहिती दिली . वाढदिवसाच्या निमित्ताने वाघचौरे परिवाराकडून दिलेली वृक्षाची व ट्री गार्ड भेट प्रत्येकाने स्विकारत वाढदिवसाच्या आठवणी रूपाने वृक्ष संवर्धन आणि संगोपन करणार असे आश्वासन दिले व या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उपस्थित सर्व मान्यवरांनी वाघचौरे परिवाराचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करून अभिनंदन आणि कौतुक केले . अशा प्रकारचे उपक्रम सर्व समाजामध्ये व्हावेत ज्यामुळे पर्यावरण वाचवन्यास निश्चित मदत होईल अशा प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांकडून येत होत्या.
या उपक्रमासाठी निसर्ग पर्यावरणाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील सल्लागार सुरेंद्र सिंग पाटील जिल्हा महाविद्यालय प्रमुख निशांत पाटील, वेदांत कुलकर्णी तसेच समता फाउंडेशन व त्यांचे कर्मचारी यांचेसह खंडाळ्याचे पत्रकार हर्षल पाटील यांनीही सहकार्य केले .
प्रसंगी महसूल विभागाचे डी वाय एस पी कुणाल सोनवणे एम एस ई बी चे राठोड , मिनिटरी स्टेशनचे कर्नल त्याचप्रमाणे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे , तालुका पोलीस निरीक्षक विलास शेंडे ,नशिराबाद पोलिस स्टेशनचे एपीआय अनिल मोरे , बाजारपेठ पोलिस स्टेशनचे एपीआय गणेश धुमाळ , बाजारपेठ पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन शहर पोलीस स्टेशनचे एपीआय गोसावी , संदीप दुंनगह , शहर वाहतुक निरोक्षक स्वप्नील नाईक, एपीआय रूपाली चव्हाण ,शांताराम चौधरी, तसेच नंदू किसन सोनवणे, सुनील सोनवणे ,श्री गायकवाड आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचेही यावेळी सहकार्य लाभले .