आयुध निर्माणी भुसावळ मध्ये भव्य प्रदर्शनाचे आयोजन –

भुसावळ – आयुध निर्माणी भुसावळ येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे

त्या अनुषंगाने दिनांक 14 व 15 डिसेंबर 2021 रोजी दहा वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत भव्य उत्पादन प्रदर्शन लावण्यात येणार आहे सदर प्रदर्शन कम्युनिटी हॉल
आयुध निर्माणी इस्टेट भुसावळ येथे आयोजित केले आहे

प्रदर्शनात प्रवेश हा सर्वांसाठी निशुल्क आहे स्वातंत्र्यप्राप्ती ला 75 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने भारत सरकारने अमृतमहोत्सव साजरा करण्याचे आयोजन केलेले आहे तरी सर्व नागरिकांनी विशेष करून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनी विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने या उत्पादन प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आव्हान वसंत निमजे महाप्रबंधक आयुध निर्माणी भुसावळ यांनी केले आहे.