भुसावळ – भुसावळ स्मार्ट विलेज ग्रामपंचायत प्रशासनाने राज्य निर्मितीचा संकल्प केलेला असून गावातील सर्व सुविधा अद्ययावत करण्यासाठी उद्यान निर्मितीच्या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे
गावातील चैतन्य विद्यालयाच्या समोर गावाच्या लगत ग्रामपंचायत प्रशासनाने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान निर्मितीला प्रारंभ केलेला असून उद्यानात ट्रॅक निर्मितीच्या कार्यास सुरुवात झालेली आहे जवळपास पंधरा ब्रास पेवर ब्लॉक मध्ये चार फुटाचा चौरस उद्यानाच्या चारही बाजूने ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणे व छोटेखानी गार्डन निर्मिती होणार असून यामुळे निश्चित गावाचा लौकिक वाढणार आहे स्मार्ट विलेज ग्रामपंचायत प्रशासन शहरी सुविधा निर्माण करण्यात यशस्वी होत असून भविष्यात राज्यस्तरीय मॉडेल व्हिलेज व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करेल असा विश्वास सरपंच योगिता सोनवणे उपसरपंच आनंद ठाकरे ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सपकाळे पप्पू राजपूत कुंदन कोळी सागर सोनवाल गजानन पवार गजानन कोळी सुभाष सोनवणे सुरेश पाटील सह समस्त ग्रामपंचायत प्रशासनाने निर्धार केलेला आहे
उद्यानाची पाहणी करताना पंचायत समितीचे इंजिनियर नागराज मॅडम व बागुल साहेब सोबत सरपंच प्रत्येक विष्णू सोनवणे व सचिन पाटील दिसत आहे



