वरणगांव : येथिल महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालया मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुषार गाजरे ( उपकार्यकारी अभियंता ) हे होते . त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला .व सर्व कर्मचारी वर्ग यांना संविधाना बद्दल माहिती दिली . तसेच सदर कार्यक्रमात रमेश मारोती निकम ( लाईनमन )यांच्या पाठोपाठ सामूहिकरीत्या संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले व घोषणा देण्यात आल्या . कार्यक्रमाच्या शेवटी दिनांक २६/११/२००८च्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली .सदर कार्यक्रमात वरणगाव शहर कक्ष सहाय्यक अभियंता डी वाय पाटील तळवेल कक्ष सहाय्यक अभियंता नितीन महाजन (सहाय्यक अभियंता ) आरती देशमुख दिपाली सोनार( सहाय्यक लेखापाल ) लाईनमन निकम प्रभाकर बोदडे ,शेख सलमान ,अमिन शहा, निलेश सरोदे, विवेक पाटील, निलेश बेंडाळे, हसन तडवी, पुनम सुरवाडे ,रुचिता लोखंडे,दत्ता उगले जितू इंगळे, संदीप पाटील , सुमेध चव्हाण योगेश सपकाळ, व ईतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



