भुसावळ : कोरोना संक्रमित रुग्णांकडून कोविड रुग्णालयातर्फे उपचारासाठी शासकीय दरानुसार बिल न आकारता रुग्णांची लूटमार कायम असलीतरी भुसावळ येथील भारतीय जनता पार्टी संचलित करोना योद्धा सहाय्य समितीच्या बिल पडताळणी समितीच्या पाठपुराव्याने रुग्णाला तब्बल 92 हजार रुपये निधीचा धनादेश परत मिळाला.

भुसावळच्या रुग्णाकडून ज्यादा बिलाची आकारणी
भुसावळ येथील रहिवासी दिलीपसिंग चौधरी आणि शोभा चौधरी यांना कोरोना संक्रमण झाल्याने ऑगस्ट 2020 या काळात जळगाव येथील रुबी हॉस्पिटल संचलित कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले. 17 दिवसांचे चौधरी यांचे बिल दोन लाख 26 हजार 200 तर सात दिवसांसाठी शोभा चौधरी यांचे बिल 93 हजार 500 रुपये काढण्यात आले. उभयंतांनी तीन लाख 19 हजार 700 बिल अदा केले. या प्रकाराबबत भारतीय जनता पार्टी संचलित करोना योद्धा सहाय्य समितीचे भुसावळ शहर अध्यक्ष डॉ. नितु पाटील यांच्याशी वाढीव बिलासंबंधी लेखी तक्रार करण्यात आली.
जिल्हाधिकार्यांकडे वाढीव बिलाबाबत पाठपुरावा
डॉ.नितु पाटील यांनी वाढीव बील अर्जाचा पाठपुरावा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांच्याकडे सुरु केला. शिवाय या रुग्णालयाबद्दल लेखा परीक्षण अहवाल यांच्या प्रती माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत मागवण्यात आल्या होत्या. गत वर्षभरात तब्बल तीन वेळा वाढीव बिलसंबंधी लेखा परीक्षण अहवाल तयार करण्यात आले. याबाबत भुसावळ तालुक्याचे आ.संजय सावकारे यांना पण अवगत करत त्यांनी पण आक्षेप निवारण समिती, जळगाव यांच्याशी चर्चा करत बिल पडताळणीबददल सुचविले. अखेर भाग्येश चौधरी यांच्या परीवाराला 47 हजार व 45 हजार 300 रुपये रकमेचे दोन धनादेश परत करण्यात आले. याबद्दल चौधरी रीरवाराने भारतीय जनता पार्टी संचलित करोना योद्धा सहाय्य समितीचे आभार मानले आहे.
योजने अंतर्गत उपचार निधी परत मिळणार
महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत ज्यांनी कोरोना उपचार घेतले तसेच रुग्णांकडून बिलदेखील वसूल केले. याबद्दल सर्व माहिती आता प्राप्त होणार असून अश्या रुग्णांना त्यांची रक्कम लेखा परीक्षण झाल्यावर परत मिळणार आहे किंबहुना काही ठिकाणी सुरवात झाली आहे. याबद्दल काही तक्रार असल्यास योद्धा सहाय्य समितीच्या कोणत्याही सदस्याशी संपर्क साधावा तसेच भारतीय जनता पार्टी आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार असल्याचे कोरोना योद्धा सहाय्य समितीचे अध्यक्ष डॉ.नितु पाटील यांनी कळवले आहे.


