यावल – तालुक्यातील विटवा (हिंगोणा )आदिवासी बांधवां सोबत देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने जनजाती गौरव सप्ताह निमित्ताने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली
15 नोव्हेंबर हा क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस गौरव दिवस म्हणून साजरा करावा व 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पर्यंत जनजाति गौरव सप्ताह साजरा करावा असे माननीय पंतप्रधान यांनी घोषित केले त्या अनुषंगाने देवगिरी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून विटवा येथे बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली
यावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडा ,मोगरा माता, राणी काजल यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात झाली
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावचे सरपंच श्री फिरोज तडवी यांनी स्वीकारले यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना घरकुल मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करेल असे सांगितले .
प्रास्ताविकात महिला प्रमुख ॲड. चित्रा आचार्य यांनी देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने सुरू असणारे काम व प्रकल्प यांची सविस्तर माहिती दिली ॲड. जयश्री देशमुख यांनी बिरसामुंडा यांचे जीवन चरित्र व त्यांनी ब्रिटिश सरकारची कसा लढा दिला यावर भाष्य केले महिला सहप्रमुख ॲड. जास्वंदी भंडारी यांनी जनजाति समाजाने प्रवाहामध्ये येण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे व त्यासाठी बचत गट ,छोटेछोटे गृहउद्योग ,व वनासंबंधित उद्योग सुरू करून स्वतःला आर्थिक बळकट करणे गरजेचे आहे व त्यासाठी लागणारे कागदपत्र बनविण्यासाठी कल्याण आश्रम वनवासी बांधवांना मदत करेल असे मत व्यक्त केले .स्वच्छता नीटनेटकेपणा असेल तर सर्व कुटुंब निरोगी राहील त्यामुळे महिलांनी स्वतः सोबत कुटुंबाची काळजी घ्यावी व कुपोषण पासून मुलांना वाचवावे असे ॲड. वैशाली चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव काशीराम बारेला यांनी केले त्यांनी त्यांच्या स्थानिक भाषेत क्रांतिवीरांचा इतिहास थोडक्यात सांगितला.आभार प्रदर्शन केंद्र संघटनमंत्री वीरसिंग वसावे यांनी केले वस्तीवरील बांधवांनी ढोल वाजवत त्यांचे पारंपारिक लोकनृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले
सदर कार्यक्रमास ॲड. निलेश भंडारी ,दिनेश बारेला हेमंत पाटील, प्रसाद भापकर कालाडोहचे गाव प्रमुख जाड्या दादा,विटवा गाव प्रमुख शांताराम दादा ,पांढरीगावचे प्रमुख कालु सिंग ,पैझरीचे गाव प्रमुख जामसिंग बारेला मोर धरणाचे प्रमुख मानसिंग दादा राजु बारेला कलीम महाराज , देवसिंग बारेला व वस्तीवरील सर्व जनजाती भगिनी व बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कल्याण आश्रमाचे कार्यकर्त व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.



