जळगाव येथे तेली समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात –

जळगाव – श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय पुस्तिके सूचीचे प्रकाशन सोहळा पार पडला.

रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय सूची प्रकाशन सोहळा कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करत मोठ्या उत्साहात तेली समाजातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला श्री संताजी जगनाडे महाराज व कडूजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वधू-वर सुचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते सर्व समाज बांधवांनी उपस्थित करण्यात आले. बी. एम. चौधरी यांनी युवक मंडळाच्या पंधरा वर्षाच्या केलेल्या समाजकार्याचे तोंड भरून कौतुक केले. तसेच अध्यक्षीय भाषणात सुरेश चौधरी यांनी मंडळाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. मंडळाने केलेल्या कार्याचे तसेच सर्व समाजाला एकत्र संघटित करण्याचे आवाहन केले.युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तिकेसाठी अथक परिश्रम घेतले.