महिलेच्या मृत्युस जबाबदार आरोपीस अपिलात 50 हजाराचा दंड :

भुसावळ – येथील २ रे अती सत्र न्यायाधीश आर एम जाधव ह्यांनी आज दि २२ . ११ . २० २१ रोजी एका आरोपीस अपीलामधे ५० हजार रुपयाचा दंड ठोठाऊन सदरची दंडाची रक्कम ही मयताचे वारसाना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश केलेत .
या बाबत सविसतर वृत असे कि आरोपी सोपान पंडीत घ्यार हे मोंढाळा येथे पीठ गिरणी चालवत होते व त्यांचे पीठ गिरणीस संरक्षक जाळी नसल्याने दि ३ . १२ . २०१३ रोजी मयत सुभदाबाई घ्यार या दळण घेऊन गेल्या असता त्यांच्या साडीचा पदर पट्टयात अडकुन त्या जखमी होऊन मृत झाल्या होत्या . त्यावेळी गावातील पोलीस पाटील ह्यांनी आकस्मित मृत्युची तक्रार दिल्याने तपासात आरोपीचे दुर्लक्ष व निष्काळजी पणाने तीचा जिव गेल्याचे निष्पन्न झाले . याबाबत सरकार तर्फे आयएसओ शे. रशिद ह्यांनी तक्रार दिली होती . आरोपी विरुद्ध भादवी कलम ३० ४ अ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्याची चौकशी भुसावळ न्यायालयात होऊन आरोपीस ३ महीने कारावास व ३००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती . हा ३००० मधून मयतचे वारसांना १५०० रु देण्याचाही आदेश करण्यात आलेला होता . आरोपीने सदरच्या निकाला विरुद्ध अपील दाखल केले . त्याचा निकाल आज दि २२ . ११ . २० २१ रोजी न्यायमुर्ती जाधव ह्यांनी अपील अंशाता मान्य करून दोषसिद्धी कायम करून आरोपीस दिलेल्या ३ महीने कारावासाची शिक्षा व द्रव्य दंडाची शिक्षेत बदल करून वरील प्रमाणे आदेश केला .
सदरकामी सरकार तर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता म्हणून अँड विजय खडसे ह्यांनी कामकाज पाहीले .