जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर आमदार संजय सावकारेंनी घेतले रामेश्‍वर महादेवाचे दर्शन –

भुसावळ : जिल्हा बँक निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भुसावळातील जागृत रामेश्‍वर महादेव मंदिरात दर्शनासाठी यावे, असा आग्रह भुसावळातील माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या प्रभागातील ज्येष्ठांनी विकासकामांच्या शुभारंभानिमित्त आलेल्या आमदारांना धरला होता व आमदारांनी देखील विजयी झाल्यानंतर दर्शनार्थ येवू, असा शब्द यावेळी दिला होता.

सोमवारी सकाळी आठ वाजता जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर आमदार सावकारे यांचा विकास सोसायटी मतदारसंघातून विजय झाल्यानंतर त्यांनी शब्द पाळत रामेश्वर महादेव मंदिरात येवून दर्शन घेतले. यावेळी त्यांचे प्रभागातील नागरीक व माजी नगरसेवक राजेंद्र आवटे व युवा समाजसेवक गौरव आवटे यांनी स्वागत करीत विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी रामेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद पवार, उपाध्यक्ष धनंजय आंधळे, सचिव दिवाकर मोरे, गौरव आवटे, किशोर टोके, योगेश वाघ, पंकज शिंदे, अंकुश वावरे सर्व सन्मानीय सदस्य उपस्थित होते.