जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत अ‍ॅड.रोहिणी खडसे विजयी – दुसर्‍यांदा मिळाली संधी : अपेक्षेनुसार मिळाला विजय :

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर या सलग दुसर्‍यांदा विजयी झाल्या आहेत.
जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 11 जागा आधीच बिनविरोध झाल्या. यात महिला गटातून आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर आणि छायादेवी दिलीपराव निकम यांना उमेदवारी मिळाली. या दोन्ही जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले तरी याला यश आले नाही. यामुळे अखेर या प्रवर्गासाठी निवडणूक घेण्यात आली. अर्थात, सहकार पॅनलची ताकद पाहता येथून रोहिणी खडसे यांचा विजय हा अगदी सहजसोपा असल्याचे मानले जात होते. सोमवारी निकालातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीत रोहिणी खडसे-खेवलकर यांना तब्बल 2200 चा लीड मिळाला असून त्या लागोपाठ दुसर्‍यांदा जिल्हा बँकेत संचालक म्हणून दाखल झाल्या आहेत.