भुसावळ – तालुक्यातील फेकरी उड्डाण पुलावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान घडली.माजी आमदार संतोष चौधरीं यांचे मदतीने जखमी गोदावरी रुग्णालयात दाखल केले.

२१ फेकरी उड्डाणपूल व चौपदरी रस्त्याचे काम चालु असल्याने वाहतुक एकेरी मार्गाने चालू असून यामुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे. दिनांक २१नोव्हेंबर २०२१ रोजी सायकाळी ७ वाजेच्या दरम्यान रवी चव्हाण व योगेश जाधव राहणार बुलढाणा हे दोघे दुचाकीवरून भुसावळ कडे जात असताना उड्डाणपुलावर दत्तात्रय नामदेव कोळी राहणार वरणगाव पिंपळगाव व चौथ्या व्यक्तीचे नाव कळले नाही यांच्या दुचाकीमध्ये समोरासमोर जबर धडक झाली व यात दुचाकी क्रमांक एम.एच.२८बी.एल. १३०० आणि एम.एच.१९ए.सी.७९०८ या वाहनांचे नुकसान होऊन दुचाकी धारक व सोबत मागे बसलेल्या व्यक्तीला जबर मार लागला आहे. या घटनेची खबर परिसरात कळताच नागरिकांनी घटनास्थळी जाऊन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला वारंवार फोन करून सुद्धा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल न झाल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प होती. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे व पोलीस पाटील विजू धांडे यांनी भेट देऊन वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.
दरम्यान अपघात झाला यावेळी भुसावळ तालुक्याची माजी आमदार संतोष चौधरी हे सुद्धा याच रस्त्याने प्रवास करत होते त्यांना या अपघाताची माहिती कळताच त्यांनी जखमींना मदत केली व वीज निर्मिती केंद्राच्या रुग्णवाहिकेत द्वारे जखमींना गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेचा पंचनामा पोलीस कॉन्स्टेबल प्रेम सपकाळे करत आहे.


