जळगावात चौघुले प्लॉट भागात तरुणाची हत्या

जळगाव – शहरातील चौघुले प्लॉट भागात रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका सलून दुकानदार तरुणाची चॉपरने सपासपा वार करून निघृणपणे हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली.

ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात राहणाऱ्या सुनील सुरेश टेमकर वय-३६ या तरुणाचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान आहे. गेल्या मागील ५ दिवसांपासून तो आजारी असल्यामुळे त्याचे दुकान बंद होते. आज रविवार रोजी त्याने दुकान उघडले अन रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर कुणीतरी चॉपरने वार केल्याने हा दुर्दैवी प्रसंग घडला व तरुण गंभीर झाला जखमी अवस्थेत त्याला जिल्हासामन्या रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालावली.

जिल्हा रुग्णालयात शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे हे पथकासह पोहचले आहे आता परिस्थिती नियंत्रणात असुन सुनील सुरेश टेमकर या मयत तरुणाच्या परिवारात आई, पत्नी योगिता टेमकर, मुलगा रोनक टेमकर, मुलगी दीप्ती, आणि भाऊ असा परिवार आहे. शनी पेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचारी हल्लेखोराचा शोध व तपास घेत आहे.