भुसावळ : लग्नाचे आमिष दाखवत शहरातील 22 वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आला मात्र विवाहास आरोपीने नकार दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
परमजितसिंग गील (शांती नगर, भुसावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
गील यांचा परीचय 2018 मध्ये युवती सोबत झाला या युवतीला गील याने लग्नाचे आमिष दाखविले.
युवतीला दोन-तीन ठिकाणी फिरावयास नेले यावेळी युवतीने विवाह करण्याबाबत युवकाला विचारणा केली असता त्याने त्यास नकार देत जातीवाचक शिविगाळ केली.
आपली फसवणूक होते हे लक्षात येताच युवतीने या प्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून गील यांच्याविरूध्द अत्याचार व जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे हे पुढील तपास करीत आहे.



