खंडाळा ता.भुसावळ (वार्ताहर) :- किन्ही ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरणी ग्रामसेवक संदीप निकम यांनी सांगितले . भरती प्रकियेच्या चौकशी बाबत मला संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा सूचना दिल्या नव्हत्या. त्यात चौकशीच्या त्या दिवशी माझे 12.30 वाजे दरम्यान ग्रामपंचायतचे कामकाज आटोपून मी जिल्हा परिषदेला कामासाठी निघून गेलो त्यामुळे चौकशी ठिकाणी हजर राहता आले नाही.

हे सर्व अनावधानाने घडले मुद्दाम गैरहजर राहायचे असा कोणताही हेतू नव्हता मात्र पुढील चौकशीच्या दिवशी संपूर्ण चौकशीसाठी मी हजर राहून ग्रामपंचायतीच्यावतीने सहकार्य करेल . भरती प्रक्रिया ग्रामपंचायतच्या बहुमताने निर्णय झाले आहे तसेच शासनाच्या नियमानुसार आणि सर्वाधिक गुणवत्ता उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरणी ग्रामसेवक संदीप निकम यांनी सांगितले आहे .


