पुन्हा एकदा बस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

बस आंदोलनाचा वणवा आता भडकला आहेत. तसेच, त्यात आर्थिक परिस्थितीमुळे हतबल कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील आणखी एका चालकाने कमी पगारामुळे बस आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गहिनीनाथ गायकवाड (असे या बस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गहिनीनाथ गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समजते. तसेच, नाशिक जिल्ह्यातील ST कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन अजून तीव्र केले आहेत. तसेच, लवकरच मागण्या मान्य कराव्यात. बसचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

नाशिक येथील आगारामध्ये बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन जोरात सुरू आहेत. हे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासन आता सक्रिय झाले आहे. तसेच, त्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या ५१ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देखील पाठवली आहे. आतापर्यंत ८५ हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता नोटीस पाठविलेल्या कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत कामावर या, अन्यथा कारवाई करू असा इशारा दिलाय. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. तसेच, आंदोलन पुन्हा एकदा जोरात चिघळण्याची शक्यात निर्माण झाली आहे.