भुसावळ – भुसावळात काँग्रेस अनु.जाती विभागाच्यावतीने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, जीवनावश्यक वस्तू इत्यादींची झालेली भरमसाठ वाढ,तसेच खाजगीकरण व शेतकऱ्यांच्या आत्महत्या याविषयी येथील प्रभाग ९ मध्ये माता रमाबाई आंबेडकर नगर येथे जनजागरण अभियान राबविण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध केला .

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र पाटील तथा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.१८ नोव्हेंबर २०२१ रोजी हे जनजागरण अभियान राबविण्यात आले.
प्रथम केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून घरगुती गॅसची हंडी व मोटर सायकल यांना पुष्पहार अर्पण करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र पाटील,जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रहीम कुरेशी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, उपाध्यक्ष इस्माईल गवळी,काँग्रेस अनु जाती विभागाचे शहर अध्यक्ष सुनिल जवरे,उपाध्यक्ष विनोद पवार,उपाध्यक्ष सागर कुरेशी,ठेवीदार संघटनेचे नेते प्रविण पाटील,तसेच दुर्गा सोनवणे,सपना पगारे,मालुबाई साळवे,सकुबाई सोनवणे देवरे आजी, बेबीबाई भालेराव विमलबाई सपकाळे,गालफाडे बाई आदी महिला व युवा ,प्रभागातील नागरिक आदी उपस्थित होते.


