वरणगाव – रोटरी क्लबने अशक्य काम शक्य करून दाखवले आहे. रोटरीच्या माध्यमातून पोलीओ निर्मुलनाचे काम संपूर्ण जगात करण्यात आले आहे. रोटरी ही समाज उपयोगी कामासाठी प्राधान्य देते. या समाजीक संस्थेच्या कामामुळे अनेक गरजू व निकडीची गरज असलेल्या नागरीकांपर्यंत पोहचणे शक्य झाले आहे. शाळामधे आजही गणित व विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांन समजून घेण्यासाठी अडचणी येत असतात. यामुळे त्यांच्य मनामधे या विषयाची भिती निर्माण होते. यासाठी रोटरी क्लबने देखील या विषयाची भिती दुर करण्यासाठी सहभागी होणे गरजेचे असल्याची प्रदिपादन रामानृजन भारत गणित यात्रेचे राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रमौली जोशी यांनी केले.

महाऱाष्ट्रात रामानृजन अमृत भारत गणित यात्रेचे आगमन झाले होते.या यात्रेचे नवशक्ती कॉम्पलेक्स मधे स्वागत रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष डॉ.संजू भटकर होते. यावेळी इस्त्रोचे माजी वैज्ञानीक जयंत जोशी, भारताचे मॅथ गुरू बी.एन.राव, होमीओ भाभा रिसर्च सेंटरचे माजी प्रमुख डॉ.सुधाकर आगरकर, नॅशनल कॉन्सील ऑफ टीचर सायंटिस्ट चे नॅशनल सेक्रेटरी संदिप पाटील, यात्रेचे महाराष्ट्र समन्वयक सुनिल वानखेडे आदि उपस्थित होते.
यावेळी यात्रेचे महत्व व उद्देश उपस्थितांना सांगण्यात आला. यानंतर डॉ. सुधाकर आगारकर यांनी रोटरीशी संपर्क नसतानाही रोटरीच्या माध्यमातून रोटरी युथ एक्सेचेंज च्या माध्यातून पदेशात जाऊन तेथील शिक्षण घेण्याची संधी मिळाली यामुळे माझ्या जीवनात नविन अमुलाग्र बदल होवू शकला.यामुळेच देशाच्या संशोधनासाठी उपयोगी पडू शकलो. याकरीता ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच रोटरीच्या माध्यमातून काम केले पाहिजे. मॅथगुरू बी.एन. राव यानी रोटरीच्या आठवणींना उजाळा देत गणित किती सोपे आहे. हे प्रात्यक्षिकातुन सांगत सुत्रे पाठ नसली तरी सहजगत्या कशा प्रकारे आपण गणित विषय सोपा करू शकतो याबाबतची माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रोटरीचे सेक्रेटरी जीवन महाजन यानी केले. यावेळी रोटरीचे सर्व सदस्य उपस्थीत होते.


