भुसावळ – हिंदू हृदय सम्राट सरसेनापती तथा शिवसैनिकांचे आराध्य दैवत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शहर व परिसरात जनतेच्या न्याय व हक्कासाठी बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांच्या वतीने बुधवार १७ नोव्हेंबर रोजी शहरात विविध भागात गोरगरीब, गरजू लोकांना अन्नदान , फराळ वाटप , ब्लॅंकेट वाटप महिलांना साड़ी यासह विविध समाजपयोगी उपक्रमाद्वारे आदरांजली वाहण्यात आली .
बाळासाहेबांची शिकवण २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण हा मूलमंत्र लक्षात घेऊन बाळासाहेबाचें कट्टर शिवसैनिक ख-या अर्थाने आदरांजली वाहत आहे . यानिमित्त आयोजित कार्यक्रमास जिल्हा पालकमंत्री, शिवसेना नेते ना गुलाबराव पाटिल यांच्या आशीर्वादाने रेल्वे स्टेशन परिसर शिवभोजन केंद्राचे संचालक शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांनी शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ यांच्या सहकार्याने बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून आदरांजली वाहून मानवंदना देण्यात आली. त्या नतर सर्वाना साहित्य वाटप करण्यात आले .
या प्रसंगी मिलिंद कापडे, अबरार शेख, रईस खान, पीयूष शर्मा, रवि जगताप, रेहान कुरेशी, प्राचार्य विनोद गायकवाड़,गोपाळ दौलत हिंगणे आदि शिवसैनिक उपस्थित होते.



