हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिदिनानिमित्त वरणगाव विविध कार्यक्रम.

वरणगाव – हिंदूहदयसम्राट,शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी वरणगाव शहर शिवसेनेतर्फे वरणगाव बस स्टँड चौकात प्रतिमा पूजन तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक सभागृह,रेणुका नगर,वरणगाव येथे प्रतीमापुजन व कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
शिवसेना नगरसेविका श्रीमती शशी कोलते यांचे हस्ते प्रतिमापूजन व लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अतुल शेटे,माजी सरपंच सुशील जंगले,माजी तालुकाप्रमुख महेंद्र शर्मा,ग्रा.सं. क.चे नितीन देशमुख,युवा जिल्हाप्रमुख ॲड.चंद्रकांत शर्मा,माजी शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर प्रभागातील नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शिवसेना शहरप्रमुख रवींद्र सुतार,उपशहरप्रमूख सुनील भोई,अशोक शर्मा,सुपडू धनगर,संजय कोळी ई.परिश्रम घेतले.