भुसावळात लिंगायत कोष्टी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा थाटात संपन्न ; सोयरीक परिचय पुस्तिकेचे झाले प्रकाशन ;

भुसावळ – येथील हातमाग विणकर कोष्टी समाज सेवा मंडळाच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा लोणारी समाज मंगल कार्यालय येथे कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे पालन करुन शनिवार दि. १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला. मेळाव्यात ६५ उपवर युवकांनी व ३१ युवतींनी आपला परिचय करून दिला. ज्यांची लग्न जमत नाहीत अशांसाठीच परिचय मेळावे असतात ही मानसिकता आता बदलली आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला श्रेयश विनंते, सिध्देश कोष्टी, पौरवी गरूडे, मिताली कोष्टी, संस्कृती पाठक यांनी स्वागत गीत सादर केले.
मेळाव्याचे अध्यक्ष नानासाहेब घोडके यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी युवराज लोणारी यांच्या हस्ते परिचय मेळाव्याच्या सोयरीक परिचय पुस्तिकेचे प्रकाशन झाले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अमोल इंगळे, पुष्पा म्हसकर, अंजली बन्नापुरे, सुभाष लवणे, अशोक वाळवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. या मेळाव्यात सोशल मीडियावर जनजागृती करुन मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातून तसेच खानदेशसह, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पुणे व मुंबई येथूनही नोंदणी करण्यात आली. तरुण-तरुणींना व्यासपीठावर बोलावून स्नेहा कानडे व अजय कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
मेळाव्याचे प्रास्ताविक मंडळ अध्यक्ष माधव गरुडे यांनी केले. सुत्रसंचालन माधुरी गरुडे यांनी व मान्यवरांचा परिचय सोनाली कोष्टी, सोनाली गरुडे, अभिषेक घोडके यांनी करून दिला.
मंडळाचे सचिव राजेश कोष्टी यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश कोष्टी, कोषाध्यक्ष दिपक विनंते, सतिष घोडके, दिपक कोंगे, संजय खोडके, दिनकर सरोदे, अॅड.सचिन कोष्टी, डॉ. राजेंद्र सेवलकर, संतोष विनंते, प्रकाश कोष्टी, दिनकर कानडे महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक कोष्टी, उपाध्यक्ष राम घोडके, सचिव निखिलेश सरवदे, अविनाश सरोदे, अतुल दांडगे, स्वप्नील कोंगे, अमोल कोष्टी, मयुर कानडे, ललित दांडगे आदी युवा कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. मेळावा यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या सरोज कोष्टी, प्रतिभा घोडके, निलिमा सरवदे, ज्योती कोष्टी आदी महिला सदस्यांचे सहकार्य लाभले. मेळाव्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तालुका समितीचे सदस्यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यात राज्यभरातून समाजबांधव उपस्थित होते.