किन्ही ग्रामपंचायतीत खा .रक्षाताई खडसे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण ;

भुसावळ – तालुक्यातील किन्ही ग्रामपंचतीमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा खासदार व आमदार यांच्या हस्ते करण्यात आले .

किन्ही गावातील ग्रामपंचायतीचे बस स्टँड ते गावहाळ पर्यत डांबरीकरण रस्ता,गटार,पेव्हर ब्लॉक,दुभाजक तथा बस स्टँड परिसर सुशोभीकरण अंदाजित रक्कम १ कोटी ९० लक्ष ३१ हजार रूपयांचे तसेच किन्ही साकरी रस्ता डांबरीकरण (विशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत) किन्ही गावात धनगर वाड्याजवळ आमदार निधीतून नवीन पुलाचे काम अंदाजित रक्कम २० लक्ष , किन्ही गावात आमदार निधीतून सामाजिक सभागृहाचे लोकार्पण (खर्च २० लक्ष) किन्ही गावात चावडी परिसर येथे खासदार निधीतून सामाजिक सभागृह भूमिपूजन (खर्च १३ लक्ष) किन्ही गावात आमदार निधीतून महिलांसाठी सुलभ शौचालय (खर्च १० लक्ष) किन्ही गावात आमदार निधीतून वार्ड क्रमांक २ मध्ये गटार बांधणे (खर्च १० लक्ष) किन्ही गावासाठी पं.स.सदस्या यांचे निधीतून कचरा संकलन गाडी लोकार्पण (खर्च ३लक्ष) ग्रा.प.किन्ही यांचे माध्यमातून गावहाळाजवळ नूतन कॉम्प्लेक्स बांधणे (खर्च १० लक्ष) आमदार यांच्या सूचनेनुसार (गौण खनिज माध्यमातून ) राम मंदिर किन्ही येथील आर.ओ.वॉटर प्लँटचे लोकार्पण असे विविध विकास कामांचे लोकार्पण व उदघाटन खासदार रक्षाताई खडसे , आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा येवले, चेअरमन सर्वोदय हायस्कुल किन्ही तर प्रमुख अतिथी सौ.वंदना उन्हाळे सभापती पं.स.भुसावळ. सौ. प्रीती पाटील उपसभापती पं.स.भुसावळ.सौ.मनीषा पाटील पं.स.सदस्या सुनील महाजन , पं.स.सदस्य राजेंद्र चौधरी, माजी सभापती पं.स.भुसावळ, भालचंद्र पाटील तालुकाध्यक्ष भाजपा अनिल पाटील चेअरमन वि.का.सो.किन्ही , आयोजक निलमताई सोनवणे सरपंच जयंत पाटील उपसरपंच संदीप निकम ग्रामसेवक किन्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य किन्ही उपस्थित होते.