साकेगाव – तालुक्यातील स्मार्ट विलेज ग्रामपंचायत साकेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी संध्याकाळी सात वाजता आयोजित युवा वर्गाच्या मिटिंग मध्ये गावातील समस्त युवावर्गाने एकत्रित येऊन आम्हाला पोलीस प्रशासकीय अधिकारी व्हायचंय , म्हणून सर्वांनी एकत्रित विचार करून निश्चय केलेला आहे त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने सहकार्य करावे त्याच बरोबर युवकांसाठी विविध सोयीसुविधा तसेच प्रशिक्षण कार्यक्रम व उत्कृष्ट ग्राउंड ट्रॅक निर्माण करावे अशा भावना व भूमिका युवकांच्या वतीने रोहन व छोटू भाऊ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात मांडल्या.
प्रसंगी डॉ.बाळासाहेब पाटील, डॉ. ठाकरे , उपसरपंच आनंद ठाकरे ग्रामपंचायत सदस्य सचिन भाऊ सपकाळे सह गावातील शेकडो भावी पोलिस व अधिकारी युवा वर्गाची उपस्थिती होती
यावर ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून युवा वर्गाचा उत्साह बघून गावात पोलिस व अधिकारी निर्माण होतील या युवकांच्या निश्चया बद्दल आनंद व्यक्त करून ग्रामपंचायत प्रशासन दुपटीने सहकार्य करणार असून गावातील प्रत्येक युवक गर्वाने ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक करेल अशा पद्धतीचे योगदान नियोजन , प्रयोजन , ग्रामपंचायत प्रशासन युवकांसाठी लवकरच करेल असे आश्वासन उपस्थित युवकांना उपसरपंच श्री ठाकरे व सचिन सपकाळे , डॉ. बाळासाहेब पाटील यांनी दिले त्यासाठी उपस्थित युवकांचा भावी पोलीस अधिकारी स्मार्ट युवा गृप (व्हाट्स अप ) लवकरच निर्माण करण्याची जबाबदारी रोहन कोळी यांनी घेतलेली आहे



