हिन्दी सेवा मंडळाचे माजी सचिव स्व.भैय्या शर्मा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन ;

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात हिन्दी सेवा मंडळाचे माजी सचिव स्व. डि.डि.शर्मा (भैय्याजी) यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला हिन्दी सेवा मंडळ, सचिव श्रीमती.एम.डी.शर्मा, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी, बिशेनजी अग्रवाल, डॉ. रविकान्त परदेशी, पंकज संड, संजय नाहटा, गोपाल अग्रवाल, नंदलाल अग्रवाल, प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच संस्थेच्या सर्व शाखांचे विभागप्रमुख, कर्मचारी व समाजातील सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान स्व. भैय्याजींच्या कार्य कर्तुत्वाला उजाळा देण्यात आला. “स्व. श्री डि.डि.शर्मा (भैय्याजी) हे एक अफाट व्यक्तिमत्व होते. त्यांचे सामाजिकच नाही तर शैक्षणिक कार्यात सुद्धा प्रचंड योगदान असून भुसावळ शहरातील नागरी आणि शैक्षणिक सोयीसुविधांसाठी त्यांनी केलेले अतुलनीय काम आणि त्याग हे भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभप्रमाणे मार्गदर्शक व आदर्श आहे.” असे प्रतिपादन ह्या प्रसंगी प्राचार्य डॉ.राहुल बारजिभे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.