गोंदिया – कोल्हापूर विशेषला १ द्वितीय ,तृतीय वातानुकूलित डब्यासह तात्पुरती मुदतवाढ

मध्य रेल्वेने 01039/01040 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) – गोंदिया विशेष ट्रेनला तात्पुरत्या स्वरुपात १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित डब्यासह मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः

01039/01040 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर)-गोंदिया विशेष ट्रेन कोल्हापूर येथून दि. ११.११.२०२१ ते २०.११.२०२१ आणि गोंदिया येथून दि. १३.११.२०२१ ते २२.११.२०२१ पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित डब्यासह मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनी प्रवासापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासण्याची विनंती केली जात आहे.

या विशेष ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.