मध्य रेल्वेचा सतर्कता जागरूकता सप्ताह महाप्रबंधक ए के लाहोटी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

मध्य रेल्वेत दिनांक 26 ऑक्टोबर ते 01 नोव्हेबर 2021 या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला
सार्वजनिक जीवनात होणारे भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मुख्य दक्षता आयोगाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मध्य रेल्वे उत्साहने विविध उपक्रम राबवित आहे.
दक्षता जागृति सप्ताहाचा एक भाग म्हणून वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी, श्री एन. डी. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शना खालि परीसवाद, क्विज, निबंध,चित्रकला,घोषवाक्य स्पर्धा व कर्मचारी तक्रार निवारण शिबिर असे विविध उपक्रम आयोजित केले गेले असून ज्यात मध्य रेल्वेच्या अधिकारी व कर्मचारी यानी सक्रिय सहभाग घेतला
क्षेत्रीय स्तरावरिल परीसवाद स्पर्धा देखिल आयोजित करण्यात आलि होती ज्यामधे मुख्यालय,मंड्ल आणि कार्यशालेतिल विजेत्यानी भाग घेतला.
तसेच या स्पर्धा परीक्षा मधे मुख्यालय स्तरावर श्री अनिल कुमार तिवारी मुख्य कार्यालय अधीक्षक याना घोषवाक्य स्पर्धेत द्वितीय पुरस्कार, श्री संतोष उपाध्याय यांना हिंदी निबंध स्पर्धेत द्वितीय पुरस्कार तसेच श्री मनोज साळुंके TGT यांना वाद विवाद स्पर्धेत प्रथम व मराठी निबंध स्पर्धेत तृतीय पुरस्कार मिळाला
वरिल सर्व स्पर्धकाना महाप्रबंधक श्री ए के लाहोटी यांच्या हस्ते प्रशस्ति पत्र व नगद पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
वरिल सर्व पुरस्कार विजेत्याचे मंडल रेल प्रबंधक श्री एस एस केडिया, अपर मंडल रेल प्रबंधक श्री नविन पाटील यानी विशेष कौतुक केले, तसेच सहायक कार्मिक अधिकारी बी एस रामटेके, वि एस वडनेरे व कर्मचारी गण यानी अभिनदन केले