भुसावळ : सुमारे 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करणार्या प्रभाग क्रमांक 21 भागातील नागरीकांना या भागात होत असलेल्या काँक्रिटीकरण कामामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या भागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक रमेश नागराणी व नगरसेविका पुष्पा बत्रा यांच्या सततच्या पाठपुराव्यातून नगरपालिकेच्या माध्यमातून काँक्रिटीकरण कामाला मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली. प्रभाग क्रमांक 21 मधील इंदिरा नगर भागातील डॉ.खानापूरकर यांच्या हॉस्पिटलपासून ते अभियंता भवनापर्यंत च्या रस्त्याचे प्रभागातील ज्येष्ठ नागरीक मालतीबाई महाजन यांच्याहस्ते व आमदार संजय सावकारे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या उपस्थित भूमिपूजन झाले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
छोटेखानी कार्यक्रमात परीसरातील नागरीकांच्या वतीने आमदार संजय सावकारे यांचा सत्कार सुनील सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक राजेंद्र नाटकर, माजी नगरसेवक निक्की बत्रा, अजय नागराणी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, डॉ.मंगेश खानापूरकर, डॉ.अर्चना खानापूरकर, भाजयुमो शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, मंगेश पाटील, चेतन बोरोले, धर्मराज देवकर, अरुण धांडे, अतुल गुरव, ज्ञानेश्वर भंगाळे, भारत बागुल, नितीन देशमुख, नंदू पाटील, बापू, बर्हाटे, रीतेश आंबोडकर, विलास सुरवाडे, मनोज सरोदे, देशमुख, प्रभागाातील महिला व नागरीक उपस्थित होते.उपस्थित नागरिकांनी यावेळेस समाजसेवक अजय नागराणी व निक्की बत्रा यांचा सुद्धा सत्कार केला सदर कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन धर्मराज देवकर यांनी केले व आभार प्रदर्शन मंगेश पाटील यांनी केले रस्त्याचे काम होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते


