भुसावळ – महाराष्ट्र शासनाने शाळांना दिवाळीसाठी १ ते १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे दिवाळी सणासुदीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना [BLO] दिवाळी सुट्टीच्या कालावधीत मतदान प्रक्रियेचे कुठले ही काम देवू नये. असे शिक्षकसेनेचे प्रादेशिक सचिव सुधीर रामदास तायडे[ताडेकर] सरांनी निवेदनाव्दारे भुसावळचे तहसीलदार दिपक धिवरे यांना विनंती केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनातून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आॕनलाईन निवडणूक कामासाठी अॕन्ड्राॕईड मोबाईल अथवा टॕप मिळावा. सतत पाच वर्षे बिएलओ म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यां ऐवजी इतर दुसऱ्या कर्मचाऱ्यांची बिएलओ म्हणून नेमणूक करावी. बिएलओ यांना अर्थिक वर्ष २०२०/२१ चे मानदान त्वरीत मिळावे. या मागण्या सुध्दा पूर्ण होण्याची विनंती शिक्षकसेनेचे प्रादेशिक सचिव सुधीर तायडे यांनी केलेली आहे.
निवेदन देतांना माध्यमिक विभाग शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद हिंमतराव गायकवाड, सर, प्राथमिक विभाग शिक्षकसेनेचे भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद गांधेले सर उपस्थित होते.



