साकरी येथील शेतमजूर महिलांना साडी वाटप व मुलांना दिवाळी फराळ ; महिला क्रिडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम ;


भुसावळ – येथील महिला क्रिडा मंडळाच्यावतीने आनंद वाटल्याने द्विगुणित होतो याउक्तिनुसार आपण सुद्धा गरीब व गरजूंना आनंद देवू शकतो या संकल्पनेतून तालुक्यातील साकरी येथील शेतमजूर महिलांसह-मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात येवून साड्या व मास्क देण्यात आले.
आनंद वाटल्याने दुप्पट होतो या उक्तीप्रमाणे महिला क्रिडा मंडळाच्या सर्व सदस्यानीं आपल्या घासातील घास (दिवाळी फराळ ) या कष्टीकरी महिलांना करीता एकत्र जमा केला . महिला व मुलाना वाटप केला यावेळी त्यांचे चेहर्यावरील फुललेले हास्य बघून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्याचा आनंद वाटला अश्या भावना अध्यक्ष आरती चौधरी यांनी यावेळी व्यक्त केल्या .
यावेळी फराळ वाटपासाठी अध्यक्ष आरती चौधरी, जयश्री ओक, प्रगती ओक, प्राची राणे, वीणा ठाकूर, वैशाली भगत यांचेसह सदस्या हजर होत्या.
यशस्वितेकरीता मुख्य सहकार्य कीरण चौधरी, पौर्णिमा ओक व प्रिता पिंगळे, वीणा ठाकूर यांनी साड्या देऊन मोलाचे सहकार्य केले . तसेच साकरी येथील रजनीताई फेगड़े, राजश्री फेगडे मयु२ी फेगडे , कल्याणी फेगडे , शालीनी ताई यांचे अनमोल सहकार्य लाभले.