भुसावळात भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवसानिमित्त देवगिरी कल्याण आश्रमातर्फे मशाल रैली


भूसावळ – देवगिरी कल्याण आश्रम व अ.भा.वनवासी कल्याण आश्रम यांच्या संयुक्त वतीने १५ नोव्हेंबर श्री भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस हा जनजाती गौरव दिन म्हणून संपुर्ण देशात साजरा करण्यात येत आहे यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन प्रांत, जिल्हा , तालुका , ग्राम , पाडे या स्तरांवर होणार आहे . सदर कार्यक्रम १५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत सर्वत्र साजरा होणार असल्याची माहीती प्रांत उपाध्यक्ष डॉ किशोर मोरे यांनी आज रविवार 31 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली .
डॉ निलेश भिरुड यांचे दवाखान्यात आयोजित परिषदेत मोरे म्हणाले की , सर्व नगरवासी आदिवासी जनजाती यांना या सोहळ्याचे स्वरूप माहिती व्हावे या उद्देशाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रांत उपाध्यक्ष
डॉ किशोर मोरे यांनी सांगत भूसावळ येथे 15 नोव्हेबर रोजी कार्यक्रम होणार आहे यावेळी या निमित्त शहरातील जामनेर रोड नाहाटा महाविद्यालय चौफुली येथून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाच्या नियमां नुसार पालन करीत मशाल रैली काढण्यात येणार आहे . सदर रैली शहरातील महत्त्वपूर्ण भागातून निघुन अहिल्यादेवी कन्या शाळा येथे समारोप होणार आहे . प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे . तसेच क्रांतिवीरांची फोटो व माहिती असलेले प्रदर्शन तसेच महिला मंडळांचे कार्यक्रम होणार आहे लोककला जनजाती पेहराव व वाद्य समवेत नृत्य प्रदर्शन व लोकगीते काही जनजाति बहुल गावांमध्ये खेळांचे ही स्पर्धा होणार आहे शहर नागरी भागातया कार्यक्रमांचे महत्त्व सांगण्यासाठी सभांचे आयोजन किंवा श्रेणीनुसार विविध ठिकाणी राष्ट्रीय जनजाती गौरव दिनाचे महत्व विषद करणारी प्रवचने सभा होतील . राज्यातील तळोदा येथे रावळापाणी येथून मशाल यात्रेला सुरुवात होणार आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जनजाती गौरव दिवसाच्या विशाल कार्यक्रमात सहभागी सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन केले .
जळगाव जिल्ह्यात सुद्धा सर्वदूर या गौरव दिनाच्या योजना संदर्भात व पूर्व तयारी सुरू असून बऱ्याच ठिकाणी स्वागत समिती प्रत्यक्ष कार्यकर्ता निश्चिती स्थान व वेळ निश्चित केली जात आहे दीपावली नंतर या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून याचे व्यापक स्वरूप पाहता हा सोहळा 15 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत सर्व दूर साजरा होणार आहे असेही प्रांत उपाध्यक्ष डॉक्टर किशोर मोरे यांनी यावेळी सांगितले .
यावेळी डॉ.निलेश भिरुड भुसावळ जिल्हाध्यक्ष , रविंद्र सराफ ,यांचेसह
महिला जिल्हा प्रतिनिधि ऍड चित्रा आचार्य , जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रांत सदस्य ऍड जास्वंदी भंडारी , ऍड जयश्री देशमुख , ऍड निलेश भंडारी उपस्थित होते .