भुसावळ – आयुध निर्माणी भुसावळ प्रशासनाकडून दिवाळी निमित्त गरीब,गरजू विद्यार्थ्यांना कपडे बूट मोजे फेस मास्क व मिठाईचे वाटप आयुध निर्माणी भुसावळ प्रशासनातर्फे दीपावली निमित्त गरीब व गरजू मुलांना महाप्रबंधक वसंत निमजे यांच्या हस्ते कपडे बूट मोजे फेस मास्क व मिठाई वाटप करण्यात आली . यावेळी अप्पर महाप्रबंधक राजीव कुमार उपस्थित होते.
महिला कल्याण समिती शाखा भुसावळच्यावतीने गरीब मुलांना मदतीचा हात हा उद्देश समोर ठेवून हे अनमोल कार्य म्हणजे एक पुण्यकर्म आहे या संकल्पनेतून
अध्यक्षा श्रीमती वैजंती निमजे यांच्या अध्यक्षतेखाली इस्टेट परिसरामध्ये पहिल्या वर्गापासून दहाव्या वर्गापर्यंतच्या गरीब गरजू मुलांना विनामूल्य शिकवणी वर्ग
ज्ञानज्योती या नावाने चालवले जातात. या मुलांना दर गुरुवारी पोषक आहार फळे दिले जातात
या शिकवणी वर्गासाठी
कंडारी परिसर इस्टेट मधील आउट हाऊस मध्ये राहणाऱ्या परिवारातील मुलेमुली मोठ्या प्रमाणात या शिकवणी वर्गाचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारे अभ्यास करतात
या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी योग्य शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे . महिला कल्याण समितीच्या वतीने दरवर्षी निशुल्क शिकवणी वर्ग चालवले जातात व त्याचा सर्व खर्च महिला कल्याण समिती आयुध निर्माणी भुसावळ शाखा करत असते .
यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षिक व महिला कल्याण समिती पदाधिकारी उपस्थित होते
महाप्रबंधक श्री वसंत निमजे यांनी ज्ञानज्योती शिकवणी वर्गातल्या मुला मुलींना दिवाळीची अनमोल भेट दिली त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले



