भुसावळ– अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्या सुधारणा योजनेतंर्गत आमदार संजय सावकारेंनी आपल्या कंडारी (ता. भुसावळ) गांव दत्तक घेऊन येथील विविध विकास कामांचा आराखडा तयार करण्यासाठी बांधकाम विभागाला कळविले. तेव्हा बांधकाम विभागाचे अधिकारी आणि तत्कालिन सरपंच योगिता शिंगारे यांनी विकास कामांचा आराखडा तयार केला. या निधीसाठी आमदार सावकारेंनी शासनाकडे सलग 5 वर्षे पाठपुरावा करून 4.55 कोटी रु.एवढा निधी मंजूर करुन आणला.
त्या कामांचा भूमीपूजन सोहळा गावांत नुकताच झाला असून, प्रत्यक्षात कामाला लागली सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

भूमीपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय सावकारे हे होते. तर कंडारी प्रभारी सरपंच निर्मला घोडेस्वार, सभापती वंदना उन्हाळे,भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी सभापती सुनील महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, भाजयुमो जितेंद्र कोळी, प्रशांत निकम, खडका माजी सरपंच चुडामण भोळे, भाजपा सचिव दिलीप कोळी, ग्रा.वि.अधिकारी श्री. शिरतुरे, माजी सरपंच डॉ सूर्यभान पाटील, माजी उपसरपंच यशवंत चौधरी, ग्रा.पं. सदस्य गौतम जोहरे, दिपक तायडे, नितीन पाटील, शारदा नंदु कोळी. तसेच संदीप शिंगारे, राहूल घोडेस्वार,चावदस मोरे, संजय मोरे,किरण जंगले, सुरेंद्र सोनवणे, शामराव मोरे, गजानन कोळी, शंकर मोरे, गोटू झोपे, हरीभाऊ महाजन, विनोद झोपे, विजय बाऱ्हे, सोनू परदेशी यांची उपस्थिती होती.
—–
या कामांचा आहे समावेश
गेल्या अनेक वर्षापासून गावाचा विकास रखडला होता. मात्र, आमदार संजय सावकारेंच्या पाठपुराव्यामुळे आता रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. या निधीतून लिंपस कल्ब ते कंडारी स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे.
वार्ड क्रं.1मधे अंतर्गत रस्ता कांक्रीटीकरण करणे. जेतवन बुध्द विहाराच्या जागेवर नवीन अद्ययावत दुमजली बुद्ध विहाराचे बांधकाम करणे. वार्ड क्रं. 2 मधे जयंती मैदानावर नवीन अद्ययावत सामाजिक सभागृह बांधणे. नदी काठावर संरक्षण भिंत बांधणे. नवीन स्मशानभूमी बांधणे. अंतर्गत रस्ते कांक्रीटीकरण करणे.
वार्ड क्रं. 3 मधे अंतर्गत रस्ते कांक्रीटीकरण करणे.
वार्ड क्रं. 4 मधे अंतर्गत रस्ते डांबरीकरण तसेच काही ठिकाणी कांक्रीटीकरण करणे.
वार्ड क्रं. 5 मधील रस्ते डांबरीकरण करणे.
तसेच पेव्हर ब्लॉक बसविणे व आवश्यक त्या ठिकाणी दोन शौचालयाचे बांधकाम केले जाणार आहे.
—-
पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविणार
यावेळी बोलतांना आमदार संजय सावकारे सांगितले की, कामे पूर्ण होताच. गावाच्या खरा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाणीपुरवठा योजना हा आहे. त्याचे आराखडे पूर्ण होऊन योजनेला लवकरात लवकर मंजूरी मिळवून. गावातील पाणी टंचाई दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. या कार्यक्रम प्रसंगी गावांतील जेष्ठ नागरिक व कोरोना योध्द्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिका मोरे यांनी केले.


