भुसावळ – माहेश्वरी युवा संगठन च्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड
कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्व संध्येला करण्यात आली, या वेळी माहेश्वरी युवा संगठनेची बैठक झाली.

बैठकीत माहेश्वरी युवा संगठन अध्यक्ष पदी मयूर नगौरी व सचिव पदी सर्वेश लाहोटी, उपाध्यक्ष पदी गोपळ हेडा,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.पदाधिकाऱ्यांचे स्वागत माहेश्वरी समाज अध्यक्ष रामवल्लभ झंवर,सचिव महेश भराडीया,माहेश्वरी तहसील सभा सचिव राजेश लढ्ढा यांनी केले.या वेळीं युवा संगठन सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.


