भुसावळ -बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू जनतेवर अमानुषपणे वारंवार तीव्र आक्रमण करून अमानवी घटना घडत आहे अश्या घटनेला सरकारने थांबवावे व समाजात शांतता पाळण्यात यावी अशी मागणी करून अष्टभुजा देवी मंदिराजवळून इस्कॉनच्या वतीने आज सकाळी हिंसक कार्यांचा निषेध म्हणून शांतीचा संदेश देत मूक मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी इस्कॉन भुसावळचे अध्यक्ष श्रीमान रासयात्रा दास व मंदिरातील ब्रह्मचारी तसेच इस्कॉन भक्त समाज उपस्थित होता. यासोबतच आर. एस.एस. संघाचे कार्यकर्ते – प्रवीण नायते, हर्षल सपकाळे व इतर स्वयंसेवक, हिंदू जनजागृती समिती चे सदस्य, अखिल भारतीय विद्या परिषदचे सदस्य, वारकरी संप्रदायाचे सदस्य तसेच अन्य हिंदू सदस्य उपस्थित होते .

गेल्या दहा दिवसापासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू जनतेवर अमानुषपणे वारंवार तीव्र आक्रमक होत आहेत, हिंदू मंदिराची तोडफोड केली जात आहे, दुर्गा मंडप व इस्कॉन मंदिर यांना आगी लावण्यात आल्या, मूर्तीची विटंबना करून भंग करण्यात आले, श्रीमद्भागवतम् व भगवद्गीता यांसारख्या पवित्र ग्रंथांना आग लावण्यात आली, हिंदू वस्त्यांवर आक्रमण केले जात आहेत, स्त्रीयांवर बलात्कार केले जात आहेत, इस्कॉन मंदिरातील भक्त - प्रांतचंद्र दास, जतनचंद्र दास, पार्थ दास यांची निर्घृण हत्या केली गेली या अमानवी घटनेला सरकारने थांबवावे व समाजात शांतता पाळण्यात यावी याचा आग्रह म्हणून आणि या हिंसक कार्यांचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला अशी माहिती मोर्चा स्थळी उपस्थित मंडळींनी दिली.
हा मोर्चा सुमारे 50 लोकांचा असून तो अष्टभुजा देवी मंदिर - जामनेर रोड या ठिकाणाहून निघून बाजार पेठ पोलीस स्टेशन - गांधी पुतळा यामार्गे
डी एस ग्राउंड येथे आला या ठिकाणी हिंसेत मारले गेलेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करीत समापन करण्यात आले.


