पाचोरा : तालुक्यातील नेरी येथील कामगार आपल्या ट्रॅक्टरसह ऊस तोडीसाठी कारखान्यावर निघाले असताना ट्रॅक्टरवरून तोल गेल्याने मजुर जमिनीवर पडला व त्याचवेळी अज्ञात वाहनाने चिरडल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला. लुकमानखा उस्मानखा शेख (50) असे मयत मजूराचे नाव आहे.

मजुराच्या मृत्यूने हळहळ
पाचोरा तालुक्यातील नेरी येथील दोन ट्रॅक्टर कामगार आणि साहीत्य घेऊन मध्य प्रदेश येथील साखर कारखाना येथे उसतोडीला जात असताना बिल्दी धरणापुढे अचानक ट्रॅक्टर वरुन मयत लुकमानखा उस्मानखा शेख (50) हा पडताच समोरून येणार्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना रविवार, 17 रोजी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. घटनास्थळी नेरी येथील बंटी भोईसह छोटु पठाण हे पोहचल्यावर त्यांनी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांना मदतीसाठी फोन करताच मदत मिळाली. ट्रॅक्टर चालवणारा मयताचा मुलगा बबलु शेख होता. अर्ध्यावरच प्रवास सोडून दोघे ट्रॅक्टर पाचोरा येथे आणण्यात आला. मयताचे मृतदेह शवविच्छेदना साठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेने नेरी गावात शोककळा पसरली.


