जायंटस वसुंधरा सहेली ग्रुप भुसावळ तर्फे किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलतांना या विषयावर मार्गदर्शन :

कळी उमलतांना
जायंट्स वसुंधरा सहेली ग्रुप भुसावळ प्रोजेक्ट चेअरमन सौ . अलकाताई सपकाळे

विकास विद्यालय जळगांव खुर्द याशाळेत किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलतांना या विषयावर मुख्य मागदर्शक सौ निलिमाताई पाटील यांनी मुलीना खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले .मासिकपाळी आल्यानंतर कशी काळजी घ्यावी हे व्हिसपर पॅड वाटप करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले . तसेच अलकाताई नी शाळेतील मुलीन कडून पर्यावण , कोरोना व बेटीबचाव पथनाट्य तसेच निबंधस्पर्धा , चित्रकला स्पर्धा .वृक्षरोपण कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कोरोना मधे प्रेमलताताई राष्ट्रीय फ्लोरेंन्स नाइटिंगेल पुरस्कार मिळालेल्या नर्स ताईंचा जायंट्स वसुंधरा सहेली तर्फे सत्कार स्पर्धेत नंबर आलेले व पथनाटय सादर केलेले विद्यार्थ्यांना वसुंधरा सहेलीतर्फे बक्षिस देण्यात आले
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन अलकाताईनी खूप छान केले होते .
अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री ए. जे . नारखेडेसर उपस्थित
आभार प्रदर्शन श्री एस आर पाटील सर यांनी केले
तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद व सर्व जायंट्स वसुंधरा सहेली उपस्थित होते .