अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शारदोत्सव :


 भुसावळ :- येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित ,अहिल्यादेवी कन्या विद्यालयात दर वर्षा प्रमाणे यंदा देखील पाच दिवसीय शारदोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. गुरुवार रोजी सकाळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी महेश कुलकर्णी यांच्या हस्ते श्री शारदा देवीची स्थापना होईल ,या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री सोनु मांडे, चिटणीस श्रीमती उषाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर उत्सवांमध्ये विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने रांगोळी , चित्रकला, हस्तकला, सजावट, वक्तृत्व, वेशभूषा व विविध कला गुण दर्शन अशा ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
        तसेच टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी या विषयावर आकर्षक प्रबोधनपर आरास विद्यार्थी व पालकांसाठी करण्यात आली आहे .
        सदर उत्सवात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन हा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होणार आहे असे उत्सव समिती मार्फत कळविण्यात आले आहे ..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदीचे सहकार्य लाभत आहे .