गरबा दांडियाला परवानगी नाही – शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून नवरात्रोत्सव साजरा करा – डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे : नवदुर्गा उत्सव निमित्त बैठक संपन्न :

भुसावळ – गरबा वा दांडियाला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही , तरी सर्व सार्वजनिक मंडळानी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून नवरात्रोत्सव साजरा करावा असे आवाहन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले .
नवदुर्गा उत्सवा निमित्त आज मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता येथील संतोषी माता हॉल येथे सोमनाथ वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती व नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी तथा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे , तालुका पोलिस निरीक्षक विलास शेंडे ,नायब तहसीलदार शशिकांत इंगळे , पालिका अधिकारी श्री पवार, यांचेसह पोलिस अधिकारी व महसूल प्रशासन , पालिका प्रशासन अधिकारी उपस्थित होते .
प्रसंगी बैठकीत पोलिस निरीक्षक इंगळे यांनी प्रास्ताविक केले श्री वाघचौरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की , देवीच्या आगमन व विसर्जन मिरणवणूका काढू नये , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्साहात परंतु साधेपणाने साजरा करा, या उत्सवात गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक उपक्रमास प्राधान्य देऊन शासनाच्या जनजागृती करावी, याबाबत मार्गदर्शक सूचनाही यावेळी पोलिस प्रशासनाने केल्या आहेत. सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोणातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक मंडळानी नगरपालिका प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. परंतु जर एखाद्या मंडळास यंदा काही अडचणी असतील व त्यांना पुढील वर्षी सातत्य ठेवायचे असेल त्यांची परवानगी ग्राह्य असेल .


मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत, घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट साध्या पध्दतीने करावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता चार फुट व घरगुती मूर्तीची उंची दोन फुटाची मर्यादा असावी . गणेशोत्सवाप्रमाने विसर्जन करण्यासंदर्भात तीन ठिकाणी पॉइंट लावले आहे .
उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने स्विकारला नागरीकांना जबरदस्ती करु नये. या उत्सावात मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी आरोग्य विषयक व सामाजिक संदेश देवून जनजागृती करावी.
गरबा, दांडिया ला परवानगी नाही वाद्य अथवा डीजे नाही इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम व सामाजपयोगी उपक्रम घ्यावे जसे-रक्तदान शिबिरांचे आयेाजन करावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबतही जनजागृती करावी.
देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन करण्यात यावी, देवीच्या मंडपात प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणार्‍या भाविकांच्या बाबतीत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. आरती, भजन, किर्तन आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडपात मूर्तिची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी व 24 तास संरक्षणाकरीता स्वयंसेवक असावे . आगमन व विसर्जन मिरवणूक नाही दरम्यान या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे पालन करावे. सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम वजा इशारा यावेळी डिवायएसपी वाघचौरे यांनी दिला.
शांतता समिती सदस्य युवराज नरवाडे व राजू खरारे यांनी मनोगत व्यक्त केले .
बैठकीस नवदुर्गा मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह शांतता समिती सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेकरीता पो ना संदीप परदेसी , प्रमोद पाटिल, बोदडे , सपकाळे यांचेसह पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .