भुसावळ : तालुक्यातील कुर्हेपानाचे गावाजवळील भुसावळ-जामनेर मार्गावरील गट क्रमांक 750, पाझर तलावाजवळ रविवार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्व . स्वप्नील स्मृती गोकुलग्रामचे (गो अनुसंधान केंद्र) उद्घाटन महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.डी.एम.ललवाणी लिखीत ‘घरट्यातून आकाशाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन समाजसेविका वंदना चौधरी यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू प्रा.प्रदीप पाटील असतील.

यावेळी श्री गुरूदेव सेवा आश्रमाचे गादिपती श्याम महाराज, वर्धमान स्थानकवासी श्री श्रावक संघाचे संघपती सुगन सुराणा, ज्ञानप्रकाश योजना जैन कॉन्फ्रन्सचे माजी अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा, समाजसेवक सदानंद भावसार, ज्येष्ठ फौजदार विधीतज्ज्ञ अॅड.अकिल शेख ईस्माईल, दि शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरूड, समाजसेवक प्रदीप लोढा, गोसेवाव्रती अॅड.विजय काबरा, परीवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील, कळमसरा सरपंच अशोक चौधरी, कुर्हा सरपंच जीवन पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन प्रा.डी.एम.ललवाणी व ललवाणी परीवारातर्फे करण्यात आले आहे.


