भुसावळ रेल प्रबंधक कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी;

भूसावळ – आज दिनांक 2 अक्टूबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता मंडल रेल प्रबंधक कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली .
या वेळी अपर मंडळ रेल प्रबंधक नवीन एन पाटिल यांच्या हस्ते परम पूज्य महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले या कार्यक्रमास वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे, मंडळ कार्मिक अधिकारी दिलीप खरात, सहायक कार्मिक अधिकारी बी एस रामटेके, वीरेंद्र वडनेरे व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते