विवरे खुर्द शेतशिवारात वीज कोसळली : 25 वर्षीय शेतमजूर विवाहितेचा मृत्यू –

रावेर : तालुक्यातील विवरे खुर्द (ता.रावेर) शेत शिवारात मुसळधार पावसासोबत विजांचा गडगडाट सुरू असतानाच वीज कोसळल्याने 25 वर्षीय शेतमजूर महिलेचा मृत्यु झाला तर महिलेची दोन वर्षाची मुलगी जखमी झाल. ही घटना वोमवारी दुपारी घडली. मुर्खी इडा वागले (25) असे मयत महिलेचे नाव आहे.

सोमवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाल्यानंतर विजांच्या गडगडाट सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. याचवेळी विवरे खुर्द शेती शिवारात ाजू पाटील यांच्या शेतात मजुरीसाठी आलेल्या वागले कुटुंबातील मुर्खी इडा वागले (25) या महिला शेतमजुराच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर महिलेच्या दोन वर्षीय रवीना नामक मुलीला किरकोळ जखम झाली. या घटनेने वागले कुटुंबावर नैसर्गिक संकट कोसळले शासनाने तातडीने दखल घेवून कुटुंबियांना भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, मुर्खी वागले (25) व त्यांचे पती इडा वागले (30) हे आपल्या चार मुलांसोबत शेतातच राहुन मजूरी करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांना राहुल (4), रवीना (2) सह चार मुले असून सोमवारी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे चार मुलांचे मातृछत्र हरपल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.