भुसावळ- जेसीआय क्लब तफै जेसी सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.यात शहरातील वाहतूक पोलीसांना तसेच विविध स्पधैतील गुणवंतांना क्लब तर्फे सन्माणीत करण्यात आले.

शहरातील पंचायती वाड्यात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ निलेश झवर व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या रजनी सावकारे होते. क्लबच्या अध्यक्षा निकिता अग्रवाल,संगीता अग्रवाल,सेक्रेटरी वर्षा जैन, प्रोजेक्ट डायरेक्टर ज्योती दरगड,सोनल झवर,आभा दरगड,राखी झवर,सुनिता अग्रवाल,जयश्री अग्रवाल,शृती लाहोटी,हेमा बेहरा,भारती राठी,दीपा पटेल,योगीता झवर,रेखा व्यास आदींची उपस्थिती होती.सुत्र संचलन ज्योती दरगड व सोनल झवर यांनी तर आभार क्लबच्या अध्यक्षा निकिता अग्रवाल यांनी मानले.


