भुसावळात अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज येथे तीन दिवसीय श्रीगणेश महोत्सव संपन्न ;


भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ तापी व्हॅली तसेच आर्या फाउंडेशन संचालित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आणि नेत्रम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे आर्या फाऊंडेशनचे अध्यक्ष उमेंन्द्र वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय श्री गणेश महोत्सव साजरा करण्यात आला. यात प्रथम दिवशी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे प्रिसिडेंट संजू भटकर व इनर व्हॅलीच्या cccc प्रा. रश्मी शर्मा , मीना नेरकर यांच्या हस्ते श्रीगणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली .व नंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली द्वितीय दिवशी पूजा थाली व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली त्यात द्वितीय दिवशी नगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर व सौ संगीता बोलके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पॅरामेडिकल क्षेत्र ही काळाची गरज आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात करीयरच्या उत्कृष्ट संधी यातून मिळू शकतात अशा पद्धतीने डॉ,कीर्ती फलटणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नेत्रम हॉस्पिटलचे डॉ सुनील मेश्राम यांनी दुपारी 2 ते 5 या वेळेत मोफत नेत्र तपासणी केली यात 75 रुग्णांची नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
तृतीय दिवशी व्यासपीठावर रोटरीचे पीडीजी राजू शर्मा आहे अध्यक्षस्थानी होते. त्यांचे स्वागत आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष उमेन्द्र वाघचौरे यांनी केले प्रमुख उपस्थितीत सरकारी अभियोक्ता ऍड. नितीन खरे तसेच रोटरी क्लब तापी व्हॅलीचे सेक्रेटरी जीवन महाजन सर. हिरकणी महिला मंच उपाध्यक्ष अंजुम खान माजी प्रेसिडेंट रोटरी तापी व्हॅली सुधाकर सनांसे ,रोटरी क्लब ऑफ तापी व्हॅली च्या प्रोजेक्ट सेक्रेटरी सौ मनीषा पाटील उपस्थित होत्या .
कार्यक्रमात पोस्टर मेकिंग स्पर्धाच्या प्रथम विजेत्या विद्यार्थिनी रेखा कोलते, द्वितीय विजेत्या विद्यार्थिनी पौर्णिमा पाटील आणि हर्षली राजपूत यांना द्वितीय बक्षीस देण्यात आले.
तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम विजेती जान्हवी घाडगे आणि द्वितीय पुरस्कार भाग्यश्री महाले यांना देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस विद्यार्थिनी जया बोराडे हिला देण्यात आले या तीन दिवसीय महोत्सवाचे प्रास्ताविक अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे प्राचार्य सौ मनीषा बाविस्कर यांनी केले तर या सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संध्या भोळे मॅडम यांनी व जीवन महाजन सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन आर्या फाउंडेशन च्या संचालिका डॉक्टर सौ वंदना वाघचौरे यांनी केले
या तीन दिवसीय महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज अडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंटच्या सौ पौर्णिमा पाटील, प्रजापती तायडे, ऐश्वर्या सुरवाडे तसेच रेखा कोलते, सारिका बढे, हर्षाली राजपूत, सायली साबळे ,आश्विनी निकम, शाहिद खाटीक, प्रफुल भट ,जया बोराडे, सुनिता बागुल व संपूर्ण विद्यार्थी ग्रुप हिरकणी महिला मंच सदस्य नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे सर्व स्टाफ व
रोटरी परिवार यांनी परिश्रम घेतले.