दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू –

दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

येवला : शेत तळ्यातील पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यातील पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. रविवार, 5 रोजी ही घटना तालुक्यातील एरंडगाव बुद्रूक येथे घडली. शेततळ्यात एकाचा पाय घसरल्यानंतर दुसरा त्यास वाचवण्यासाठी गेला असता त्याचाही बुडाल्याने मृत्यू झाला. हर्षल संतोष जगताप (13) व शिवा संतोष जगताप (11) अशी मयत भावंडांची नावे आहेत. एरंडगाव येथील शेतकरी संतोष जगताप हे पत्नी शोभा यांच्यासह रविवार, 5कामानिमित्त बाहेर गेले असता सातवी व पाचवीत शिकणारे हर्षल व शिवा हे शेततळ्यावर गेले. एक जण घसरल्यावर दुसरा त्याला वाचवण्यासाठी सरसावला मात्र त्याचाही पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.