भुसावळात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉकड्रील : गणेशोत्सवात शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करा- डीवायएसपी वाघचौरे :

भुसावळ-शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी , कोविड 19 च्या अनुषंघाने नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरीता येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मॉकड्रील करण्यात आले . यावेळी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप इंगळे,तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे,तसेच गोपनीय विभागाचे बाजारपेठचे पोलीस नाईक संदीप परदेशी, शहर पोलिस स्टेशनचे प्रमोद पाटील व सर्व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी शहरातील गांधी पुतळा , सातारा,डेली मार्केट,जामनेर रोड,विठ्ठल मंदिर वार्ड बाजारपेठ पोलीस स्टेशन या भागातील गणेश मंडळांच्या अध्यक्ष व सदस्य यांना उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करा असे आवाहन केले .
9 सप्टेंबर पासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे सध्या कोरोनाचे प्रमाण कमी असले तरी संकट टळलेले नाही , खबरदारी घेत आनंदात व उत्साहाने नियमांचे पालन करीत संयमाने गणपती उत्सव साजरा करा असेही डीवायएसपी वाघचौरे म्हणाले .गणेश मंडळांची परवानगी काढणे अनिवार्य असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार गणेश मंडळांची उभारणी करणे गरजेचे आहे.मंडळांच्या बाजूने चारचाकी वाहन जाइल अशी जागा सोडून त्याप्रमाणे मंडळांची उभारणी करावी.वादग्रस्त जागेवर मंडळ बांधकाम करू नये.कुठलेही वाद्य वाजविण्यात शासनाची बंदी आहे.गणेश मंडळांची मिरवणूक काढू नये.गणेश स्थापने नंतर मंडळामध्ये पाच जणांच्या व्यतिरिक्त गर्दी करू यासह अनेक सूचना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिल्या . तसेच काही कायदेशीर अडचणी आल्यास किंवा वाद झाल्यास जवळील पोलीस स्टेशनला त्वरीत संपर्क साधावा असेही सांगीतले.