हुडको कॉलनीत पाण्याची तिव्र समस्या : पाणीपुरवठा नियमित होणेबाबत परिसरातील महिलांनी मुख्याधिकार्‍यांना दिले निवेदन :

भुसावळ -नगरपालिकेकडून भुसावळ वासियांना होणारा पाणी पुरवठा नियमित व सुरळीत व्हावा यासाठी शिवशक्ती हुडको कॉलनी बिजलीनगर(आनंदनगर) परिसरातील महिलांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले.
पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अनेक महिन्यांपासून अनियमित आहे. पाणी केव्हा येईल या संदर्भातील काही वेळापत्रक नाही कधीही कितीही वाजता रात्री बेरात्री पाणीपुरवठा होतो काही भागामध्ये दोन-तीन दिवसांतून पाणी येतं काही भागात दहा दिवसांतून तर कधी पंधरा दिवसातून नळाला पाणी येत तेही अशुद्ध पाण्यातून अळ्या, गांडूळ ,माती मिश्रीत पाणी असते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे या संदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या तरी काहीच उपाययोजना नाही म्हणून नाईलाजाने महिलांनाच याविरुद्ध मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करावे लागले.
मुबलक पाणी असल्यामुळे कमीत कमी हप्त्यातून दोन वेळा पाणी मिळावे व वेळापत्रक ठरवून देऊन कमीतकमी हप्त्यातून दोन वेळा तर पाणी सोडावे असे निवेदनात मागणी केली आहे.
तसेच हायवे करून जाणार सर्विस रोडला लागून असलेल्या नाल्यातून हुडको वासीयांसाठी पाईपलाईन टाकलेली आहे तेथे लिकेज असल्यामुळे नाल्यातील जंतू मिश्रित पाणी पुरवठा होतो या सर्व बाबींचा लवकरात लवकर मुख्याधिकारी साहेबांनी दखल घेऊन काहीतरी उपाययोजना करावी.
निवेदन देतांना सह्या करणाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून स्वाती श्रीगोंदेकर ,शकुंतला नित्नवरे ,अनिता राणे ,अनिता जयस्वाल, किर्ती दाभाडे ,कल्पना नेहे ,सुनीता सुनील राणे ,अपर्णा श्रीगोंदेकर ,अलका वाघरे, सुनिता अनिल राणे, विमल साकेगावकर, सुनंदा खरे, ॲड जास्वंदी भंडारी (पाटील) , शकुंतला राणे , तुषार जैस्वाल व प्रविण कांबळे आदी उपस्थित होते