भुसावळ – ५ सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी सन्मान गुरूवर्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शिक्षक महर्षी पुरस्कार २०२१ चे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे प्रेसींडेंट डॉ.संजू भटकर असतील. यावेळी प्रमुख् पाहुणे म्हणुन शिक्षक पदवीधर आ. डॉ. सुधीर तांबे, आ. संजय सावकारे, उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, ग.स. सोसायटीचे माजी संचालक तुकाराम बोरोले आहेत. याप्रसंगी सेक्रेटरी जीवन महाजन, ट्रेझरर सुनिल वानखेडे, प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे, प्रोजेक्ट समन्वयक प्रदिप सोनवणे उपस्थीत राहतील.

यावेळी भुसावळ, बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर, यावल, रावेर तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयातील २० शिक्षकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम रोटरी क्लबच्या सभागृहात ५ सप्टेंबरला सकाळी १०.३० वाजेला होणार आहे. शिक्षक महर्षी पुरस्कार २०२१ ने सन्मानित होणारे शिक्षक पुढील प्रमाणे –
जिल्हा परिषद विभाग
नारायण विठ्ठल कुंभार (कोळन्हावी, यावल), विजय रामगिर गोसावी (कुसुंबे,रावेर),रविंद्र पांडुरंग चिंचपुरे (शेवगे पिंपरी, जामनेर), रामचंद्र शंकर काळे (वाकी,बोदवड), दिपाली बापू पाटील (साकरी, भुसावळ), ममता सिकंदर तडवी (काहूरखेडे,भुसावळ), गणेश यशवंत कोळी (चिंचखेडे बू, मुक्ताईनगर), काजी एजाजुद्दिन खलीलूद्दीन ( यावल ),
माध्यमिक विभाग
नितीन भास्कर झांबरे (अ.ध. चौधरी विद्यालय व ज्यु. कॉलेज डोंगर कठोरा,यावल), विजय राजकुमार मंगलानी ( आर.एस.आदर्श हायस्कूल, भुसावळ ), सुभाष रामदास महाजन ( सरदार जी.जी. हायस्कूल अॅण्ड ज्यु.कॉलेज, रावेर), हेमंत सुधाकर देशपांडे ( शिवाजी हायस्कूल, मुक्ताईनगर ), सुरेंद्र अशोक पाटील ( गो.द. ढाके विद्यालय, एनगाव,ता. बोदवड ), सुरेश आनंदा सुरवाडे ( न्यु.इंग्लीश स्कूल, जामनेर), खाजगी प्राथमिक विभाग जियाउन्नबी मोहिबुर रहमान शेख ( अलहिरा उर्दु प्राथ. शाळा भुसावळ ), राजकुमार लिलाचंद जैन ( श्री शिवप्रतीष्ठान रावेर संचलीत सरस्वती विद्या मंदिर, रावेर), ज्ञानेश्वर हरिदास चौधरी( राष्ट्रीय शिक्षण संस्था, बोदवड )
महाविद्यालय विभाग
प्रा. डॉ. अविनाश एन. सोनार ( श्री.व्ही.एस नाईक कॉलेज, रावेर), प्रा.नंदन वसंतराव वळींकार( अ.ध. चौधरी विद्ायालय व ज्यु कॉलेज, डोंगरकठोरे ,यावल ), डॉ.प्रा.भाग्यश्री शैलेंद्र भंगाळे ( पी.ओ. नाहाटा कॉलेज भुसावळ )


